भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी,शेवगाव
शेवगाव: तालुक्याच्या पूर्व दुष्काळी भागाच्या पाणी प्रश्नावर अँड शिवाजीराव काकडे व जि प सदस्या सौ हर्षदाताई काकडे यांचे सतत चिंतन चालते.या चिंतनातून बऱ्याच गोष्टी सातत्याने करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे विरोधकांनी चुकीच्या बातम्या प्रसिद्धी पत्रकात देऊन जनतेची दिशाभूल करू नये असे प्रतिपादन खरडगावचे मा सरपंच जनशक्तीचे नेते भगवानराव डावरे यांनी पत्रकार परिषदेत केले.यावेळी पुढे बोलताना डावरे म्हणाले की, ताजनापूरची जुनी कढी कशाची करतात याची बातमी देणाऱ्यांनी माहिती घेतली पाहिजे.कढी कशाची तयार होते याचे प्राथमिक ज्ञान जर त्यांनी मिळवलं आणि शिळीकढी व ताजी कढी यातील फरक जर त्यांना कळाला तर फार मोठा साक्षात्कार त्यांना होईल.ताजनापूरच्या प्रश्नांची ज्यांना अ ब क ड देखील ओळख नाही अशा लोकांनीतर या प्रश्नाबाबत न बोललेलेच बरे.उगाच कुणाच्यातरी सांगण्यावरून बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करू नये.यातील बोलवता धनी कोण हे जनतेला माहित आहे. गेल्या ३०-४० वर्षात कुणालाही न समजलेले विषय हे दिशाभूल करणाऱ्यांच्या नेत्याच्या आकलन क्षमतेपलीकडचे आहेत.आम्ही जे विषय हाताळतो ते हाणून पाडण्याचा केविलवाना प्रयत्न विरोधक करतात. जनतेचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यां लोकांना आता जनता भीक घालणार नाही.लाडजळगाव गटाच्या गोळेगाव तलावाच्या संदर्भात काकडे दाम्पत्यांनी विविध पातळीवर चांगला पाठपुरावा केला आहे.त्यावेळचे जलसंपदा खाते ज्यांच्या ताब्यात होते बहुदा त्यांचेच नातेसंबंध या प्रकल्पाला आडवे आले.त्यांनीतरी या प्रश्नाबाबत ब्र शब्द काढू नये. हे त्यांना शोभत नाही.त्यांनी याबाबत स्वतःच्या नेत्याला जाब विचारावा. आमच्या पाठपुराव्या बाबत जर कुणाला शंका वाटत असेल तर त्यांनी आम्ही केलेल्या पाठपुराव्याची कागदपत्रे पहावीत.आम्ही त्यांना कागदपत्रे दाखवायला तयार आहोत असा तिरकस सवाल ही यावेळी भगवानराव डावरे यांनी विरोधकांना लगावला.










