बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
पुणे: माधुरी पवार आणि गौतमी पाटील या दोघींच्याही अदा एकमेकांपेक्षा भिन्न आहेत तसेच दोघींची ही नृत्य सादर करण्याची शैली ,अदाकारी देखील वेगळी आहे.महाराष्ट्रभर आपल्या नृत्याने चर्चेत असलेल्या दोन व्यक्ती कोण असे जरी म्हटले तर माधुरी पवार आणि गौतम पाटील ही नावे लगेच आठवतात. आणि डोळ्यासमोर दिसतात. कारण महाराष्ट्रातील सार्वजनिक कार्यक्रम गाजवण्यात या दोघी अग्रेसर आहेत अभिनेत्री माधुरी पवार आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांनी त्यांच्या नृत्यातून लोकांची मनं जिंकली आहेत. दोघींचाही फँन क्लब प्रचंड मोठा आहे. आतापर्यत या दोघींना चाहत्यांनी वेगवेगळ्या मंचावर पाहिले आहे. पण नुकतेच या दोघीं एकत्र आणि एकाच मंचावर दिसल्या आणि निमित्त होते हडपसर येथिल “टि ओस कँफे” चे उद्घाटन. माधुरी पवार आणि गौतमी पाटील या दोघींच्याही अदा सादरीकरण हे एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. तसेच दोघींचीही नृत्य सादर करण्याची शैली देखील वेगळी आहे. दोघींचीही क्रेझ प्रचंड जास्त आहे. तरीपण गौतमीच्या डि जे शो वर माधुरीची भन्नाट मराठमोळी लावणी भारी पडली.झी युवा वरील “अप्सरा आली” या रियालिटी शो ची विजेती म्हणून माधुरीने तिच्या मेहनतीच्या जोरावर जिद्दीने यश संपादन करत आज महाराष्ट्रामध्ये आपल्या चाहत्यां प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे.स्वतःच्या कलेच्या बळावर आज माधुरीने तिचे स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.लावणी ही महाराष्ट्राची लोककला आणि लावणी नेमकी काय असते.हे लावण्यवती,अप्सरा, नृत्यांगना,दिलखेचक अदाकारी, सादर करणारी अभिनेत्री माधुरी पवार पेक्षा जास्त कोणाला माहिती असणार. महाराष्टाची आवडती नृत्यांगना आहे हे तिने तिच्या मदमस्त आदाकारीने हडपसर येथिल कार्यक्रमात सिद्ध करून दाखवून दिले.माधुरी पवार ने सादर केलेल्या लावणीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि तिचे प्रचंड कौतुकही झाले.