भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव: स्वतंत्र भारताच्या 76 स्वातंत्र्य दिनाचे व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष्याच्या समारोप कार्यक्रमाचे औचित साधून देशातील शहीद जवान व स्वातंत्र्य सेनानी यांच्या सन्मानार्थ देशाचे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मेरी माटी मेरा देश उपक्रमाअंतर्गत प्रत्येक गावाची माती स्वातंत्र्य दिनी दिल्ली याठिकाणी पाठवण्यासाठी ग्रा.पं कार्यालय ढोरजळगाव आणि श्रीराम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय ढोरजळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज परिसरातील मातीचे संकलन करून विधीवत पूजन करून या मातीचा कलश स्वातंत्र्य दिनी दिल्ली या ठिकाणी पाठवण्यात आला यावेळी ढोरजळगाव गावच ग्रा पं सदस्य देविदास गिर्हे,ग्रामविस्तार अधिकारी बढे भाऊसाहेब,विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे,पर्यवेक्षक सुनील जायभाये,जेष्ठ शिक्षक पांडुरंग व्यवहारे,ईश्वर वाबळे यांचे सह ग्रा.पं कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.