अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांकरीता शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे वर्ग पाचवी मध्ये शिकत असलेल्या 147 विद्यार्थ्यांकरीता मोफत शालेय गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर चे व्यवस्थापक श्री विजयसिंह गहिलोत यांनी विद्यार्थ्यांना गणवेशाबद्दल माहिती देताना सांगितले की, शालेय गणवेश हा एकात्मतेचे प्रतीक आहे. भारतात विविधतेत एकता कशाप्रकारे आहे तर ते म्हणजे शालेय जीवनात सर्व जाती धर्माचे विद्यार्थी एकाच वर्गात, एकाच गणवेशात बसून विद्यार्जन करत असतात. म्हणून आपण सर्वांनी विद्यार्जना सोबत एकात्मतेचे सुद्धा भान ठेवावे आणि गणवेशाचा सन्मान करावा म्हणजेच आपण देशाचा सन्मान करणार याप्रसंगी बेरार एज्युकेशन सोसायटीच्या सचिव स्नेहप्रभादेवी गहीलोत, प्राचार्य अंशुमान सिंह गहलोत उपप्राचार्य एस बी चव्हाण उपमुख्याध्यापिका आर एस ढेगे, जगमोहनसिंह गहिलोत विपिनसिंह गहीलोत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.