संजय भोसले
तालुका प्रतिनिधी , कणकवली
सुशिक्षित बेरोजगार युवा वर्गाला प्रशासकीय सेवेची संधी प्राप्त करून देणारी एक बहुमोल अशी सुवर्णसंधी आहे.त्यासंदर्भातील प्रक्रियेदरम्यान इच्छुक व पात्र उमेदवारांना जाणवणाऱ्या अनेक अडी-अडचणी, शंका दूर करण्यासाठी तळेरे- खारेपाटण विभागीय भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हा परिषद विभागातील सुशिक्षित बेरोजगार युवा वर्गासाठी सदरच्या मार्गदर्शन व सहाय्य शिबीराचे आयोजन गुरुवार दि.१७ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत तळेरे येथील विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालयात करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत गट – क या संवर्गाची विविध विभागातील रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची असून त्या संदर्भातील अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तसेच प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद प्रमाणे शैक्षणिक अहर्ता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित मुदतीत उमेदवारी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. सदरचे उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.२५ ऑगस्ट २०२३ अशी आहे.सुशिक्षित बेरोजगार युवा वर्गाला प्रशासकीय सेवेची संधी प्राप्त करून देणारी ही एक बहुमोल अशी सुवर्णसंधी आहे.त्यासंदर्भातील प्रक्रियेदरम्यान इच्छुक व पात्र उमेदवारांना जाणवणाऱ्या अनेक अडी-अडचणी, शंका दूर करून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या उदात्त हेतूने आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पक्षाच्यावतीने रवींद्र उर्फ बाळा जठार (माजी सभापती – वित्त व बांधकाम, जि. प. सिंधुदुर्ग) व दिलीप तळेकर (माजी सभापती, पं. स. कणकवली) यांनी तळेरे – खारेपाटण जिल्हा परिषद विभागातील सुशिक्षित बेरोजगार युवा वर्गासाठी सदरच्या मार्गदर्शन व सहाय्य शिबीराचे आयोजन केले आहे. सदरच्या मार्गदर्शन व सहाय्य शिबीरास मार्गदर्शक म्हणून ‘गुरुकुल करिअर अकॅडमी, ओरोस’ येथील प्रा.एस.जी. ढोनुकसे व प्रा.बी.एस जांभेकर हे उपस्थित राहून बहुमोल असे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या प्रसंगी आमदार नितेश राणे, माजी सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, तळेरे उपसरपंच शैलेश सुर्वे हे उपस्थित राहणार आहेत. तरी तळेरे – खारेपाटण विभागातील सुशिक्षित बेरोजगार युवावर्गाने या मार्गदर्शन व सहाय्य शिबीरास बहुसंख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने राजेश जाधव व दिनेश मुद्रस यांनी केले आहे.


