सतीश पाचपुते
तालुका प्रतिनिधी अकोले
अकोले — येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गर्दनी शाळेत पालक मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती परबतराव नाईकवाडी , टाकळी केंद्राच्या केंद्रप्रमुख रोहीणी खतोडे , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक रावते , पोलीस पाटील संतोष अभंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पालक मेळाव्यात आलेल्या पालकांचे स्वागत प्रथम शाळेतील पदवीधर शिक्षक बबन गाडेकर यांनी केले . या मेळाव्यात अनेक विषयावर विचार मंथन करण्यात आले. स्कॉलरशिप परीक्षा , विविध शैक्षणिक अँप , शालेय उपक्रम , शालेय पोषण आहार , गणवेश , लाभाच्या योजना याबाबत सविस्तर माहिती शिक्षक संतोष सदगीर,विनायक कदम,तुकाराम आवारी, मीनाकुमारी गोडसे,राजेंद्र भाग्यवंत आदींनी पालकांना दिली.शाळेचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ हासे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेची गुणवत्ता व भौतिक सुविधांचा आलेख मांडत शाळेपुढील काही समस्या पालकांसमोर मांडल्या . विशेषतः के .जी .चे वर्ग चालू करण्याच्या मुद्यावर चर्चा घडवून आणली . केंद्रप्रमुख रोहीणी खतोडे यांनी पालक मेळाव्याचे विशेष कौतुक केले तसेच पालकांना पाल्यासंदर्भात मार्गदर्शन केले . जिल्हा परिषद शाळेचे महत्व विविध उदाहरणांनी पटवून दिले. पालक मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक रावते यांनी शाळेच्या कामकाजावर समाधान व्यक्त करत शाळेत भविष्यात कोणकोणत्या सुविधा पुरवता येतील यावर चर्चा केली पालकांनीही काही विषय मांडले त्यावर चर्चा करण्यात आली .कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना सुचना तुकाराम आवारी यांनी मांडली तर अनुमोदन सुमन भोर यांनी दिले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र भाग्यवंत यांनी केले . शेवटी गोड आभार प्रदर्शनाने पालक मेळाव्याची सांगता झाली .