डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी, परभणी
सेलू : दि.11शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करावे, अशी मागणी सेलूतील नूतन विद्यालयातील शिक्षकांनी वेतन अधिक्षकांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद, नूतन विद्यालयातील शिक्षक प्रतिनिधी परसराम कपाटे, डॉ. संतोष मलसटवाड, फुलसिंग गावित, बाबासाहेब हेलसकर, सुरेश हिवाळे, संतोष क्षिरसागर, अरविंद अंबेकर, व्यंकट तोरनाळे, अनंतकुमार विश्वंभर, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, विजेंद्र धापसे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांनी पत्रे काढल्या नंतरही वेतन अधिक्षक कार्यालय कार्यवाही करीत नाही, अशी खंत कपाटे यांनी व्यक्त केली असून 15ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांमार्फत मुख्यमंत्र्यांनाही या मागणीचे निवेदन सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.


