सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव : येथील जेष्ठ नागरिक संघाने आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे (पाटील)तसेच कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव चे प्राचार्य डॉ.एस.एन.शिंदे ,तसेच साकोरे येथील सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व करणारे रमेश बोरसे यांचा व्यक्तिगत स्वरुपात जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य माणिकराव कवडे यांनी सत्कार व स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रावण आढाव, उपाध्यक्ष जयवंत साळवे, कोषाध्यक्ष शिवाजी निकम, शिवाजी गरुड, विलास बच्छाव, कारभारी काकळीज, भिका पाठक, रंगनाथ चव्हाण, कृष्णा रत्नपारखी,विद्यार्थी व पालक तसेच जेष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते.