बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड : खानवटे ता दौंड येथील 2 शेतकऱ्यांचे आडिच ते तिन ऐकर ऊस जळून खाक झाला आहे. हि घटना दुपारी 1 वाजता खानवटे येथिल भिगवण-राशिन रोड लगत घडली आहे. ऐका बाजूला शेतकऱ्यांना हमी भाव नाही, दुसरीकडे शेती परवडत नाही. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणून हि घटना घडली की काय अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये चालू होती. येथील शेतकरी शरद ढवळे यांचा आंदाजे दिड ऐकर,तर सिद्धेश्वर शिलवंत यांचा ऐक ऐकर ऐवढा ऊस महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शाँर्टसर्कीट होवून जळून खाक झाला आहे.आग विझविण्यात शेतकऱ्यांना यश आले अन्यथा शेजारील मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्राला आग लागुन फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. त्यांच्याशी आमचे दैनिक अधिकारनामा चे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे यांनी संपर्क साधला आसता त्यांना भावना आनावर झाल्या आणि आत्महत्या शिवाय पर्याय उरलेला नाही असे म्हणून त्यांनी महावितरणकडून नुकसान भरपाई ची मागणी केली आहे. यावेळी ऊसाला लागलेली आग विझवण्यासाठी शेजारील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










