रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
नुकत्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोलाच्या वतीने जिल्हा स्तरीय योगासन यास्पर्धे च्या शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजनऑफिसर क्लब, अकोला येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत आयुष विशाल भोपळे या १४ वर्षा खालील वयो गटात पहिला क्रमांक येऊन सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे. तर धनंजय संजय हागे व योग जुगलकिशोर लाखोटीया हे विद्यार्थी अनुक्रमे रौप्य व कास्य पदकाचे मानकरी ठरले आहेत. या खेळाडूची निवड विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी झालेली आहे. या त्यांच्या यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक दादासाहेब भोपळे, अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, कोषाध्यक्ष पुखराज राठी, कार्यवाह श्यामशील भोपळे, संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे, प्राचार्या रजनी वालोकार, पर्यवेक्षक प्रा.संतोषकुमार राऊत आदींनी त्याचे कौतुक करून विभागस्तरीय सहभागासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. खेळाडू आपल्या यशाचे श्रेय योगा प्रशिक्षिका वर्षा भोपळे, निलेश कासोटे,क्रीडा प्रशिक्षक अक्षय मोरखडे यांना देतात.