डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी, परभणी
सेलू: ता.7 सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव या गावी उपसरपंचाच्या मुलाचा गावातील काही विरोधी मंडळींनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला.या गावातील श्रीमती शशिकलाबाई रमेश कांबळे यांनी सेलू पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली त्यातून पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गावातील काही व्यक्तींनी आपल्या पतीस तू उपसरपंच पदाचा राजीनामा दे असे म्हणत लहान व मोठ्या मुलांना सुद्धा मारहाण सुरू केली. जातीवाचक शिवीगाळ ही केली. या जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत निखिल रमेश कांबळे याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.दरम्यान या प्रकरणाने गावात मोठा तणाव निर्माण झाला आहे.