विठ्ठल मोहनकर
तालुका प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली : हिंगोली जिल्हात सतत पावसाने झालेल्या नुकसानेनी पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीला आर्थिक मदत देण्यात आली. भोसी येथील पुरामध्ये वाहुन गेलेल्या त्यांच्या वारसांना उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांच्या हस्ते 4 लाख रुपये चेकद्वारे अनुदान वाटप करण्यात आले आहे.यावेळी तहसीलदार विठ्ठल परळीकर,नायब तहसीलदार एल.लाखाडे ,संजय पाटील, नितीश कुलकर्णी, उमाकांत मुळे होते.युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डीले यांनी शासनाचे आभार मानले .










