मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
शेवगाव तालुका तलाठी कार्यालयात महसूल सप्ताह निमित्त कामगार तलाठी किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महसूल सप्ताहा साजरा करण्यात आला. एक ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त तहसील कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून महसूल सप्ताह सुरुवात करण्यात आली. 2 ऑगस्ट रोजी शेवगाव शहरातील विविध महाविद्यालयात जाऊन युवकांशी संवाद साधून महसूल कामकाजाची माहिती देण्यात आली. 3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा या संकल्पनेतून लाभार्थ्यांना मदत करून प्रशासक आपल्या दारी या योजनेची माहिती देण्यात आली. 4 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात जनसंवाद साधण्यात आला. 5 ऑगस्ट रोजी तालुक्यातील माजी सैनिक यांना बोलून त्यांचा सत्कार करून मार्गदर्शन करण्यात आले महसूल दिनानिमित्त तहसीलदार साहेब प्रशांत सांगळे, प्रांत अधिकारी प्रसाद मते, मंडळआधिकरी सोनिली दहिफळे ,कामगार तलाठी किशोर पवार, सरकारमान्य स्टॅम्प विक्रेते प्रशांत काते ,सह सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप ,इ उपस्थित होते.


