प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
पाथरी : शहरातील खाजगी शिकवणीच्या शिक्षकांची विद्यार्थी व विद्यार्थिनींची सुरक्षितता, या विषयावर पाथरी पोलीस ठाण्यात गुरुवार दि.3 ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विषयावर मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या. मागील काही दिवसा त रोड रोमिओन कडून शालेय विद्यार्थिनींची छेड काढण्याच्या काही घटना घडल्याने विद्यार्थिनी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. रोड रोमिओनचा बंदोबस्त करण्याची मागणी पालक व विविध संघटनांकडून करण्यात आली होती. यावर पोलीस प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलत खाजगी शिकवणी व शालेय परिसरात गस्त वाढवली आहे. त्यामुळे रोड रोमियोंना चांगलाच ताप बसला आहे. यावरही उपायोजना करत पोलीस प्रशासनाने गुरुवार दि.3 ऑगस्ट रोजी पाथरी पोलीस ठाण्यामध्ये शहरातील खाजगी शिकवणीचे शिक्षक व कॅम्पुटर इन्स्टिट्यूट चे चालक यांची बैठक घेतली. या बैठकीस 22 खाजगी शिकवणीचे शिक्षक व कॅम्पुटर इन्स्टिट्यूट चे चालक हजर होते. सदरील शिक्षकांनी आपल्या कोचिंग सेंटर च्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे, क्लासेसचे ओळखपत्र देणे आणि क्लासेस चा ड्रेस कोड ठेवणे याबाबत, तसेच इतर आवश्यक सुरक्षिततेचे उपाय याबाबत मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व कोचिंग क्लासेस चालकांचा व्हाट्सअँप ग्रुप बनविण्यात आला आहे. त्यामध्ये दामिनी पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे नंबर ॲड करण्यात आले आहेत.


