रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : अकोला शहर येथील श्री राज राजेश्वर दरबार सुंदरकांड मंडळ मागील 28 वर्षा पासून सुंदरकांड आणि रामायण व भजन ची सेवा देत आहे, मंडळ फक्त अकोला जिल्हाच नाही तर संपूर्ण भारतभर मध्ये अकोला चा नाव लौकीक केला आहे. सुंदरकांड मंडळा चे प्रमुख कीर्तनकार श्री श्याम शर्मा हे कीर्तनशास्त्र मध्ये पदवीधर असून त्यांचा विशेष शैलीत संगीतमय सुंदरकांड हे श्रोत्यांना आकर्षित करते आणि सुंदरकांड प्रती लोकांची आवळ होऊन रामचरित मानस चा प्रचार ही होतो. आणि अकोट येथील रामधुन मंडळ हे अधिक मास आणि प्रत्येक उत्सवा दरम्यान वेग वेगळे भक्तिमय कार्यक्रम आयोजित करित असतात आणि त्याच श्रीखळा मध्ये दिनांक 01 ऑगस्ट 23 रोजी अधिकमास निमित्त अकोट शहरात संकट मोचन हनुमान मंदिर पोलीस स्टेशन अकोट शहर चे बाजूस अग्रसेन भवन येथे दुपारी 03/00 वाजता रामधून मंडळ यांनी श्री राज राजेश्वर दरबार सुंदरकांड मंडळा चा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी जास्तीत जास्त श्रोत्यांनी सुंदरकांड श्रवण आणि पठण करण्याचे आवाहन आयोजक श्री रामधुन मंडळ अकोट यांनी केला आहे.











