बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड : दि.२३ जुलै रोजी यवत ता दौंड रेल्वे स्टेशन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यवत गावातील महिला बचत गटांची मीटिंग पार पडली. या ठिकाणी यवतमधील महिला रणरागिनींनी या मिटींगला मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली.या मीटिंगमध्ये यवत परिवर्तन ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली व ग्रामसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा मान राजश्रीताई आबासाहेब दोरगे यांना मिळाला.सचिवपदी सुषमाताई आढाव,कोषाध्यक्षपदी सुरय्याताई शेख यांची निवड करण्यात आली. तसेच सी.आर.पी.पदी प्रचंड मताधिक्याने निकिताताई घिगे २९ मते मिळवत निवडून आल्या यावेळी महिलांना महिला एकीकरण,ग्रामविकास चालना, उद्योजकता,आर्थिक पाठबळ,व्यावहारिक ज्ञान,सबलीकरण सक्षमीकरण अशा विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली. यावेळी जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्षा दौंड सारिकाताई भुजबळ यांनी परिवर्तन ग्रामसंघ हा येणाऱ्या काळामध्ये नक्कीच परिवर्तन घडवेल. जास्तीत जास्त बचत गटांच्या महिलांना आपल्या ग्रामसंघामध्ये घेण्याचे आवाहन करण्यात आले.तसेच येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनल तयार करून महिला ग्रामपंचायतीला सक्षम पर्याय देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आणि सर्वच्या सर्व जागांवर महिला उमेदवार निवडणूक लढवणार असे त्यांनी जाहिर केले. आणि जिजाऊ ब्रिगेडच्या दौंड तालुका संघटक रुकसानाताई शेख यांनी आभार मानले.