नंदकुमार कावळे
तालुका प्रतिनिधी, महागाव
महागाव : पंचायत समिती परिसरात महिला आत्म्हदहनाचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाल्याने वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांनी अपमानास्पद वागणूक देत फोटो घेण्यास मज्जाव केला.या घटनेचा पत्रकार संघटनांनी निषेध नोंदविला असून बीडीओवर कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.जलजीवन मिशन अंतर्गत अनंतवाडी येथे काम सुरू आहे.कामात गैरप्रकार होत असल्याने जलजीवन मिशन निधीचा अपहार होत असल्याची तक्रार सामजिक कार्यकर्त्या सीमा वानखेडे यांनी तक्रार केली होती. टक्केवारीत पंचायत समितीची अनेक अधिकारी टक्केवारीत सहभागी असल्याने तक्रारीची दखल प्रशासन घेत नव्हते.तक्रार कर्त्या महिलेने दोन वेळेस उपोषणे करून प्रशासनाला कार्यवाही करण्याची मागणी रेटून धरली होती. आश्वासनाच्या फैऱ्या झाडून गटविकास अधिकारी मोकळे झाले. तक्रार बेदखल होत असल्याने संतप्त झालेल्या महिलेने पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.पोलिसांच्या सतर्कतेुळे पुढील अनर्थ टळले.या घटनेची माहिती दैनिक नवराष्ट्र चे तालुका प्रतिनिधी गणेश भोयर यांना मिळाल्याने ते घटनास्थळी पोहचले.घटनेचे वृत्त संकलन करण्यासाठी फोटो घेत असताना गटविकास अधिकारी यांनी त्यांना रोखत फोटो घेण्यास मज्जाव केला.आणि लोकासमोर अपमानास्पद वागणूक देत लोकशाहीच्या चौथ्या आधर स्थंभाची मुस्कटदाबी केल्याने पत्रकार संघटना आक्रमक झाली. या प्रकरणी पत्रकार संघटनेच्या वतीने बीडिओ ज्ञानेश्वर टाकरस यांचा निषेध नोंदवला. कार्यवाही करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांचेकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यावेळी गजानन वाघमारे , ज्ञानेश्वर ठाकरे , रियाज पारेख , अमोल राजवाडे , विनोद कोपरकर , धम्मानंद कावळे,संतोष जाधव ,पवन रावते ,नंदू कावळे , रजत खाडे ,श्रीकांत राऊत , किरण नरवाडे , आदी पत्रकार निवेदन देतेवेळी उपस्थिती होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)