शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ
उमरखेड : तालुक्यात . 20 व 21 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदुश्य अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतजमिनी खरडून गेल्या तसेच नदी नाल्या काठावरील गावातील नागरिकाच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करून शेतकऱ्याला प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी उमरखेड तालुका काँग्रेस कमिटी व राष्ट्रवादी च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे .
दोन दिवसात झालेल्या पावसाने उमरखेड तालुक्यात हाहाकार माजविला असून सातही महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदी नाल्याला पूर येऊन या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेती पिकासह जमिनी खरडून गेले आहे अगोदरच या खरीप हंगामात पावसाला विलंब झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणीच्या संकटांना सामोरे जावे लागले त्यातच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आसमानी संकटाने पूर्णता उध्वस्त केले आहे या अतिवृष्टीच्या पावसामुळे उमरखेड विभागातील शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस सोयाबीन हळद ऊस तूर ज्वारी उडीद तीळ मुंग यासह फळ पिकाचे व पालेभाज्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा अवस्थेत असलेल्या शेतकरी वर्ग हतबल व चिंताग्रस्त झाला आहे .महापुराचे अनेक गावातील घरात पाणी शिरल्याने सर्वसामान्य कुटुंब पूर्णता उघड्यावर आले आहेत या बाधित नागरिकांना व शेतकऱ्यांना गरजेतून बाहेर काढण्यासाठी तात्काळ आर्थिक मदतीची नितांत गरज आहे तरी उमरखेड विभागातील सातही मंडळातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी अनुदान द्यावी अशी मागणी यावेळी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर ,माजी आमदार विजय खडसे ,काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेशराव चव्हाण, विजय नरवाडे, रमण रावते, संदीप हिंगमिरे, कृष्णा पाटील देवसरकर, जितेंद्र पवार ,राष्ट्रवादी चे राजू जयस्वाल ,बालाजी आगलावे ,बुटले,मंगेश वानखेडे शंकर राणे प्रकाश नरवाडे, गजानन चव्हाण, रामराव गायकवाड ,किशोर ठाकूर प्रदीप पाटील देवसरकर ,गजानन सुरोशे, रामदास कदम, अक्षय सुर्यवंशी ,बाळासाहेब नाईक, इनायतुल्ला जनाब किशोर वानखेडे यांच्यासह असंख्य काँग्रेस व राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ व्यंकट राठोड यांना निवेदनाद्वारे केली आहे.

