प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी. पाथरी
पाथरी येथील नामदेव नगर मध्ये दि. 22 जुलै ते दि 28 जुलै पर्यंत शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे.ही कथा बाळू कुंडलिकराव राऊत यांच्यावतीने नामदेव नगर येथील हनुमान मंदिरामध्ये होत आहे,ही कथा ह.भ.प.प्रकाश महाराज केदारे यांच्या सुश्राव्य वाणीतुन या कथेचे सादरीकरण होत आहे या कथेस नामदेव नगर , माळीवाडा, पुरा, व शहरातून अनेक भक्तगण कथा ऐकण्यात येत आहेत ही कथा दुपारी १२ ते ०५ या वेळेत होत आहे.ही कथा यशस्वी होण्यासाठी नामदेव नगर येथील सर्व तरुण मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने परिश्रम घेत आहेत,या कथेच्या माध्यमातून देव देश आणि धर्म याविषयी जनजागृती पर कथन प्रकाश महाराज हे करत आहेत.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)