अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
अतिवृष्टीमुळे उमरखेड तालुक्यातील बाळदी या परिसरा मध्ये कापूस,सोयाबीन,तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या सर्व शेतक-यांचे झालेल्या पिक नुकसानीची तात्काळ पाहणी व पंचनामे करण्याचे मा.तहसीलदार यांनी दखल घेऊन तातडीने मदत करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष शाखा बाळदि यांच्या वतीने करतआहे. तालुक्यात धुवाधार , ढगफुटी होऊन जोरदार पाऊस कोसळला,त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन जमिन खरडुन गेली आहे. स्थामुळे शेतकरी चिंतेने ग्रासलेला आहे. मा.तहसिलदार,साहेब आपण त्वरित तलाठ्या मार्फत शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचे नुकसानग्रस्त,पिकांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यासाठी आदेश पारित करून,बाळदी येथील प्रत्येक शेतकऱ्याला तातडीने मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे,यावेळी निवेदन देतांनी बाळदी शाखा प्रमुख प्रवीण इंगळे ,अविनाश दुधे,नितीन राठोड ,प्रफुल वानखेडे ,दीपक ठाकरे व आदी गावकरी उपस्थित होते.


