नंदकुमार कावळे
तालुका प्रतिनिधी, महागावं
महागाव : विनाविलंब, विनापंचनामा, मदत जाहीर करा या मागणीसाठी प्रचंड गर्दी झाल्यामुळे तालुक्याचे लागले लक्ष महागाव तालुक्यामध्ये अति पावसामुळे गेल्या ४२ वर्षाचे विक्रम मोडला असुन २४ तासात २३८ मी, मी, पर्जन्यमान झाले आहे, त्यामुळे शेतकरी आणि गरीब वर्ग हैराण झाले , कारण प्रार्थमिक अंदाजानुसार एकुण ३७ हजार ७६० हेक्टर शेतातील पिकाचे नुकसान झाले असावे आणि ३७४ हेक्टर जमीनच खरडून गेल्याचे कळविले आहे, यात प्रत्यक्ष यापेक्षा जास्त क्षेत्रफळ बाधीत झाले आहे, परंतू तहसीलदार आणि एस डी ओ काळबांडे साहेब यांनी बाधीत घराची अद्याप माहीतीच संकलीत झाली नाही एकुण ११२ गावांपैकी केवळ ३७ गावाचाच नुकसानीचा अहवाल प्राप्त झाले आहे, वास्तविक पाहता निराधार किंवा पुर्णतः नुकसान झालेल्या कुटुंबातील व्यक्तिला प्रत्येकी ५००० रु तातडीने २४ तासात देणे बंधनकारक असतांना, ४ दिवस उलटूनही सानुग्रह रक्कम कोणत्याही गावातील बेघर झालेल्या कुटुंबाला दिलेली नाही केवढी ही दिरंगाई आता मात्र मा, क, पा, आणि किसान सभेनी आक्रमक पवित्रा घेतला असून स्थानिक पातळीवर प्रत्येक पात्र कुटुंबाला आर्थिक मदत मिळेपर्यंत कटाक्षाने भाग घेण्याचे जाहीर केले आहे,
ननिवेदनातील ५ मागण्या मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार मार्फत पाठवुन १) विनाविलंब विनापंचनामा हेक्टरी ५० हजार रुपये द्या, २) ज्या घरात पाणी घुसले त्यांना बेघरांचा लाभ द्या,३)ज्यांची घरे पडली आहे त्यांना मदत देवुन घरकुल द्या,४)अतिव्रुष्टीग्रस्ताचे पिक कर्ज माफ करा, आणि ५) यांना विनातारण मुद्रालोण मंजूर करा ,यात शासनस्तरावरुन दोन आठवड्यात योग्य निर्णय घ्यावा नाही तर मा, क, पा, किसान सभा आणि भारताचा लोकशाहीवादी युवा संघ यांनी गाव तेथे आंदोलन करण्यात येईल असेही जाहीर केले आहे.