संजय भोसले
तालुका प्रतिनीधी, कणकवली
सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी,तोंडवली येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून श्री सरस्वती कॉलेज ऑफ अँग्रीकल्चलर (बी.एस्सी. अँग्रीकल्चलर) कॉलेज सुरू होत आहे.कणकवली तालुक्यातील तोंडवली हे गाव निसर्ग संपन्न असल्याने येथील शैक्षणिक संकुलात बी. एस्सी अँग्रीकल्चलर व्हावे असे संस्थाध्यक्ष
श्री वसंत सावंत यांचे स्वप्न होते आज अखेर हे स्वप्न पूर्ण झाले आहे. यामुळेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती विषयक शिक्षण जिल्ह्यातील मुलांना उपलब्ध होणार आहे.सध्यस्थितीत बी.एस्सी नर्सिग,आर.जी. एन.एम. आर.ए. एन.एम.,बी.फार्मसी., डी.फार्मसी,बी.एड सारखे अभ्यासक्रम यशस्वीपणे सुरू असून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ महाराष्ट्र शासन,महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे मान्यताप्राप्त व डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्नित बी.एस्सी.अँग्रीकल्चलर अभ्यासक्रम सुरू होत आहे. गेल्या वीस वर्षांत सर्वच शैक्षणिक विभागात शैक्षणिक दर्जा व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीने सामाजिक बांधिलकीतून काम केले असून यासाठी संस्था अध्यक्ष वसंत सावंत, सचिव निखिल सावंत, संचालिका वर्षा सावंत,संचालक जयेश सावंत नेहमीच प्रयत्नशील राहणार असून शैक्षणिक क्षेत्रासह कॅम्पस मुलाखतीद्वारे विधिध क्षेत्रात नोक-या उपलब्ध करून देत आहेत.