माबुद खान
तालुका प्रतिनिधी जिंतूर
एका बैनर वर
विद्यमान आमदारांचा प्रताप
“पुरी दाल ही काली निकली”
दुसऱ्या बॅनर वर
“माजी आमदार साहेबांचे आभार”
असे म्हणत आजी-माजी आमदारात बॅनरबाजी रंगली
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात तील पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील शेत रस्ते पानदान रस्ते घरकुल वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरी फळबाग लागवड यासारख्या विविध योजनांबाबत आजी-माजी आमदारांनी तालुक्यातील अनेक गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामांच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे केल्या होत्या.या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाचे सर्वच गावातील रोजगार हमी योजनेच्या कामाच्या चौकशीसाठी एक समिती गठीत केली व त्या समितीचा चौकशी अहवाल तब्बल सहा महिन्यानंतर आल्याने आजी-माजी आमदारांचे समर्थक, कार्यकर्ते, गावकऱ्यांनी एकमेकांवर परस्परविरोधी तुमच्याच आशीर्वादाने कामे बंद झाल्याचे सांगत आभार प्रदर्शनाचे फलक शहरातील तहसील कार्यालयासमोर रस्त्यावर झळकवले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये हे फलक मात्र चर्चेचा विषय बनला आहे. तरी शहरात व तालुक्यात बॅनरबाजी वरून चर्चा रंगली असून माजी आमदार विजय भांबळे यांनी पत्रकार परिषदेत काय बोलले पहा.