बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड : मणिपूर राज्यात गेली तीन महिने दोन गटातील वादात दंगली,जाळपोळ ,महिलांवर आत्याचार चालू आहेत.४ मे रोजी दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली.यावेळी जमावाने या दोन महिलांवर अमानवी अत्याचार केले.सामुहिक बलात्कार केला.सदरच्या घटनांचा व्हिडिओ व फोटो सोशल मीडिया वर देशभर प्रसारित झाल्यावर या बाबतीत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारताची मान शरमेने खाली गेली आहे.हिसंक जमावाने गावातील सर्व घरांची तोडफोड केली,आगी लावल्या, लुटमार केली. मणिपूर ची जनता भयभीत होऊन शेजारच्या राज्यात आश्रयाला जात आहे.महिला,मुली असुरक्षित आहेत.राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले आहे.गेली तिन महिने पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री कोणीही या विषयावर बोलायला तयार नाहीत.राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्य व केंद्र शासन प्रयत्न करताना दिसत नाहीत.तेथील जनतेच्या मनात विश्वास निर्माण करु शकत नाही.या साठी आता महामहीम राष्ट्रपती यांनीच हस्तक्षेप करून राज्य व केंद्र शासनाला योग्य ते निर्देश देणे आवश्यक आहेत. आम आदमी पार्टी देशभरात या घटनेचा तिव्र निषेध करीत आंदोलने करीत आहे.त्याच अनुषंगाने आज आम आदमी पार्टी दौंड तर्फे तहसिलदार दौंड यांच्या मार्फत राष्ट्रपती व पंतप्रधान यांना निवेदन देऊन तिव्र निषेध करण्यात आला.व दोषींवर फास्टट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी केली आहे. प्रसंगी रवींद्र जाधव, तालुका संयोजक, श्रीमती नीना जोसेफ, महिला अध्यक्षा,शाम महामुनी, शहराध्यक्ष,रुपेंद्र जैन, अध्यक्ष, व्यापारी आघाडी व इतर आप चे सदस्य उपस्थित होते.