मधुकर केदार
तालुका प्रतिनिधी शेवगाव
ढोरजळगाव येथील कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे संस्थापक कर्मयोगी जगन्नाथ उर्फ आबासाहेब कान्होजी काकडे यांच्या १०४ व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित जयंती माहाची सांगता विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे सादरीकरण आणि या एक महिन्याच्या कालावधीत पार पडलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करून करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य श्री. विक्रमराव उकिर्डे यांनी आपल्या मनोगतात कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी सुरू केलेल्या कार्यामुळे खरतर आज या विद्यालयात आपण एकत्र येऊन हा जयंती उत्सव साजरा करीत आहोत शाळेने महिनाभर राबवलेल्या उपक्रमांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच जीवन संस्कार देण्याचे काम झाले आणि यासाठी संस्थेचे अध्यक्ष एड.डॉ.विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे आणि सौ.हर्षदाताई काकडे यांचे परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले पाहिजेत असे मत मांडले.विद्यालयातील इ 11वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु.बकाल स्वाती हिने आपल्या मनोगतात आबासाहेब काकडे यांनी विस्कळीत झालेली समाजव्यवस्था शिक्षणाने सुधारेल या हेतूने शैक्षणिक , सामाजिक व राजकीय कार्य केले असे मत मांडले.
विद्यालयाचे प्राचार्य श्री.संजय चेमटे यांनी आपल्या प्रास्ताविकात महिनाभर राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती देताना शिक्षण आणि सुसंस्कार या दोन गोष्टी विद्यार्थ्यांच्या जीवनात रुजवण्यासाठी गेले महिनाभर विविध उपक्रम राबवले गेले आणि विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमात उस्फुर्त सहभाग नोंदवून हा जयंती माह यशस्वी केला असे सांगितले.कार्यक्रम सांगता समारंभ प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री.संजय चेमटे,पर्यवेक्षक श्री.सुनील जायभाये,संस्था प्रतिनिधी श्री.सुरेश तेलोरे, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री.कैलास देशमुख यांचे सह श्री.संभाजी लांडे,श्री.देविदास गिर्हे,श्री.रज्जाकभाई शेख,श्री.भिवसेन केदार,श्री.अनंता उकिर्डे,श्री.महादेव पाटेकर,श्री.गणेश कराड,श्री.विजय पाटेकर,श्री.विजय म्हस्के, श्री.पांडुरंग गरड,श्री.अनिल नागरगोजे,श्री.पांडुरंग सांगळे,श्री.आसाराम शेळके ,श्री.रघुनाथ सातपुते,श्री.नवनाथ साबळे,श्री.विश्वास वांढेकर,श्री.मोतीराम काळे,श्री.मारुती पांढरे,श्री.कल्याण जायभाये,श्री.बाळासाहेब पाटेकर,श्री.शेषराव गिऱ्हे,श्री.दिगंबर साबळे,श्री.कैलास पाटेकर,सूचित पाटेकर, पत्रकार.मधुकर केदार, डॉ.देविदास देशमुख, पत्रकार श्री.दीपक खोसे,श्री भारत भालेराव श्री.रवींद्र कणके यांचेसह पालक ,विद्यार्थी, ग्रामस्थ ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.पूनम वाबळे व श्रीम. रत्नमाला फलके यांनी केले तर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.सुनील जायभाये यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदान गायनाने झाली.