राजेंद्र पोटफोडे
ग्रामीण प्रतिनिधी अमरापूर
अमरापूर:शेवगाव तालुक्यातील अमरापूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या 104 व्या जयंती माह निमित्त विद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.त्या अंतर्गत आज विद्यालयामध्ये आबासाहेब काकडे शिक्षण शास्त्र महाविद्यालय शेवगाव येथील प्राध्यापक राजेंद्र काळे सर हे आज प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते.कार्यक्रमाची सुरुवात आबासाहेब काकडे व निर्मलाताई काकडे व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. विद्यालयाचे प्राचार्य श्री. गणपत शेलार सर यांनी काळे सरांचा यथोचित सन्मान केला.प्राध्यापक काळे सर यांनी आबासाहेब काकडे यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला त्यामध्ये त्यांनी आबासाहेब काकडे यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये दिलेले योगदान सांगितले तसेच विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन केले.आजच्या दुसऱ्या सत्रात शेवगाव तालुक्यातील प्रथीत यश डॉक्टर सौ.स्वाती सातपुते मॅडम या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या. विद्यालयातील शिक्षिका श्रीमती गीता करपे यांनी त्यांचा सत्कार केला.डॉ स्वाती सातपुते यांनी आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना त्यांचे आरोग्य त्यासाठी लागणारा पोषक आहार तसेच मानसिक व शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यावे तसेच त्यांना असणाऱ्या समस्या आपल्या घरातील माता-भगिनींना सांगाव्यात त्यामध्ये कोणताही संकोच बाळगू नये याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या सोडविल्या तसेच वयात आल्यानंतर होणारे शारीरिक व मानसिक बदल यावर सविस्तर चर्चा केली.तसेच स्वाती सातपुते मॅडम यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आले.