भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी,शेवगाव
शेवगाव :त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल शेवगांव येथे त्रिमूर्ती एन डी ए विंग प्रमुख कर्नल के पी सिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मिलेट्री कॅम्प आयोजित करण्यात आला.यामध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.मॅरेथॉन स्पर्धेत एकूण 302 बालसैनिक व बालसैनिका यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड स्नेहल घाडगेपाटील-चव्हाण पाटील ह्या होत्या.तर मुख्य अतिथी म्हणून शेवगांव पोलिस स्टेशनचे परिविक्षाधीन सहाय्यक पोलिस अधिक्षक बी चंद्रकांत रेड्डी साहेब, सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा साहेब, सहाय्यक फौजदार भास्कर बालवे साहेब,नगरसेवक सागरभाऊ फडके पाटील,पो काॅ सुभाष खिळे, वाहतूक निरीक्षक राहुल खेडकर,कर्नल के पी सिंग साहेब,त्रिमूर्तीनगर मुख्य सैनिकी प्रशिक्षक परमेश्वर कसाळ,संकुलाचे मुख्य प्रशासक बाळासाहेब कोकरे, प्राचार्य श्रीमंत काळे,प्राचार्या श्रीमती सरिता जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड स्नेहल घाडगे पाटील,आय पी एस बी चंद्रकांत रेड्डी साहेब,कर्नल के पी सिंग साहेब,मानदविश्वस्त बाळासाहेब कोकरे यांनी सर्व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी बी चंद्रकांत रेड्डी साहेब,आशिष शेळके साहेब,विश्वास पावरा साहेब,डॉ अभय देशपांडे आदींनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला.या स्पर्धेदरम्यान पोलिस स्टेशनचे पांडुरंग दहिफळे,पो हे काॅ वाघमारे दादा व स्टाफ नी चोख बंदोबस्त ठेवला.तसेच शेवगांव ग्रामीण रुग्णालयाने रूग्ण वाहिका सह डॉ.ठोंबरे व स्टाफचे सहकार्य मिळाले.उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत संकुलाचे मानदविश्वस्त तथा मुख्य प्रशासक बाळासाहेब कोकरे सर,प्राचार्य श्रीमंत काळे सर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विज्ञान महाविद्यालय प्राचार्या श्रीमती सरिता जगताप मॅडम यांनी केले.विजयी स्पर्धकांना सुवर्ण,रौप्य व कांस्य पदकाने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.बक्षिसपात्र बालसैनिक बालसैनिका.गट 6 वी ते 8 वी मुलेप्रथम-पावरा उमेश नटवर द्वितीय – गावित आयुष जलाराम.तृतीय- पाटील तुषार संदिप.मुलींमध्ये प्रथम- पावरा मुक्ता संजय द्वितीय -वळवी सपना दिलीप तृतीय-वळवी छाया सुन्या इ 9 वी ते 12 वी गट मुले.प्रथम – पावरा रोहित चंपालाल.द्वितीय- रहासे गणेश लाल्या.तृतीय- शिंदे आदित्य देवप्रसाद.मुलींमध्ये प्रथम- मालवणकर साक्षी अशोक द्वितीय गोडे उज्वला लहानू. तृतीय – नाईक शितल कांतीलाल यांनी घवघवीत यश संपादन केले.यावेळी पावरा साहेब,शेळके साहेब,आय पी एस बी चंद्रकांत रेड्डी साहेब,कर्नल के पी सिंग साहेब, अध्यक्षा ॲड स्नेहल घाडगेपाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा ज्ञानेश्वर खरड यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्य प्रशासक बाळासाहेब कोकरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेजर धनवटे सर, मेजर मरकड सर,सर्व विभाग प्रमुख व स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


