मधुकर केदार
शहर प्रतिनिधी,शेवगाव
शेवगाव:आज त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक शिक्षण महर्षी साहेबरावजी घाडगेपाटील साहेब यांचा वाढदिवस,संत ज्ञानेश्वरांनी सातशे वर्षापूर्वी या भूमीवर ज्ञानेश्वरी सांगितली.त्याच नेवाश्याच्या तेलकुडगांव या छोट्याशा खेड्यात घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असतांना इयत्ता सतवी पर्यंत मराठी शाळेतुन व गांवापासून सात किलोमिटर पायी चालत ढोरजळगाव या ठिकाणी श्रीराम विद्यालयातून माध्यमिक अकरावी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर कमवा व शिका योजनेतून कुठलाही आर्थिक हातभार नसताना बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर मधून शिक्षण पूर्ण केले पुढे मावसमामा पठाडे पाटील यांच्या आर्थिक मदतीने नगर काॅलेज मधून एम एस्सी चे शिक्षण पूर्ण केले व उच्च प्रतिभेच्या जोरावर केंद्रीय सेवेत आय ई एस मध्ये तसेच शासनाच्या राज्य परिवहन महामंडळ,विखे पाटील अभिययांत्रिकी महाविद्यालय लोणी,भारतीय सैन्यदल,बृहन्मुंबई महानगरपालिका उपायुक्त आदी प्रशासकीय पदांवर काम केले.उच्च पदावर काम करत असतांना त्यांचे मनात आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी समाजातील मुलांसाठी मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था करावी ही त्तीव्र तळमळ होती.म्हणूनच त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेची स्थापना 24 नोव्हेंबर 1995 मध्ये केली.त्रिमूर्ती पावन प्रातिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून संस्थेची निर्मिती करून संस्थापक साहेबरावजी घाडगेपाटिल यांनी मुलांचे बालविश्व निर्माण केले.इ पहिली ते इ बारावी पर्यंत मुले व मुली सैनिकी शाळांतर्गत शिक्षण घेत आहे.अहमदनगर जिल्ह्यामध्ये संस्थेचे सहा ठिकाणी संकुले आहेत.विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यात धामनगाव रेल्वे येथेही संस्थेने निवासी के जी ते बारावी पर्यंत शैक्षणिक शाळा,सी बी एस ई,इंग्रजी माध्यम,डी.एड कॉलेज,मुलींचे सीनियर महाविद्यालय सुरू केले आहेत.88 एकर्सच्या या संकूलात आज 1200 मुलेमुली वस्तीगृहात आहेत.त्रिमूर्ती संकुलाचे पहिले रोपटे तेलकुडगांवच्या शाळेपासून सुरु झाले.तेलकुडगांवी मराठी माध्यमिक ज्यूनिअर काॅलेज,इंग्रजी शाळा,मुली॔चे डी एड 300 मूली व 300 मुलांसाठी वस्तीगृहाची उत्तम व्यवस्था केलेली आहे.तेलकुडगांवच्या मातीने आजपर्यंत नामवंत गुणवंत तसेच राष्ट्रीय खेळाडू विद्यार्थी घडवले आहेत.या गावातील विद्यार्थी शासकीय सेवेत अधिकारी पदावर जावेत ही साहेबराव घाडगे पाटील यांची तळमळ आहे.तेलकुडगांव संकुलात ग्रामीण भागात गुरूकूल पध्दतीचे शिक्षण देणेसाठी उत्कृष्ठ सुविधा निर्माण केलेल्या आहेत.संस्थेचे त्रिमूर्तीनगर नेवासा, तेलकुडगाव,ढोरजळगांव ने, शेवगाव,घोगरगांव,श्रीरामपूर, अहमदनगर,धामणगांव रेल्वे अमरावती या ठिकाणी सर्व सोई सुविधा युक्त शैक्षणिक संकुल आहेत. संस्था 22 महाविद्यालये,16 शाळा, 3 सीबीएससी शाळा व 11ज्यूनिअर काॅलेजेस चालवित आहे.
सर्व संकुले वसतिगृहयुक्त असून आज रोजी संस्थेमध्ये 8500 मूले-मुली वसतिगृहामध्ये राहून शिक्षण घेत आहेत तसेच संस्थेच्या मालकीच्या 52 बसेस मधून जवळपास 3000 विद्यार्थी अप डाऊन करतात व स्वतंत्रपणे 7500 मुले मूली ये जा करतात.विशेष म्हणजे प्रत्येक संकुलात मुलींची संख्या ज्यास्त आहे.बेसीक सैनिकी प्रशिक्षण सर्व विद्यार्थ्यांना सक्तीचे असलेमुळे विद्यार्थांचे आयुष्य शिस्तबद्ध व वक्तशीर बनते.नैतिक मूल्याधिष्ठित शिक्षण नेमबाजी,घोडेस्वारी, मैदानी खेळ,ज्यूदो,कराटे पॅरासीलिंग, कुस्ती,इंटेरियल इत्यादि खेळ मुले व मुलींसाठी आवश्यक आहेत व यामुळे विद्यार्थांचे मनोबल वाढविण्यास मदत होते.सैनिकी गुणवत्तेबरोबर संस्थेमध्ये क्रीडा शिक्षणावर अधिक भर दिला जातो . सर्व खेळांसाठी राष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगणे उभारण्यावर संस्थेने भर दिलेला आहे,कारण खेळबरोबर शारीरिक वाढीबरोबर मानसिक संहंशक्तीही लाभते व करिअर्स घडविण्यासाठी विशेष मदत होते. संस्थेअंतर्गत काळाचा वेध घेऊन श्रमदानातून वृक्षरोपण व जलसंधारनांची कामेही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी,पालक व शिक्षकांनी मिळून केली आहेत . संस्थेचा परिसर अनेक वृक्ष व फळझाडे लावून हिरवागार केलेला आहे.ग्रामीण भागामध्ये विशेषत शेतकर्याच्या मुलांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे यासाठी प्रामुख्याने त्रिमूर्ती संकुलाची निर्मिती करण्यात आली. सांगण्यास अभिमान वाटतो की , त्रिमूर्तीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अनेक क्षेत्रामध्ये विविध पदांवर अधिकारी,डॉक्टर,इंजीनिअर व व्यवसायमध्ये यशस्वी झालेले आहेत. समाजाची वैचारिकता लक्षात घेऊन मुलींना फीजमध्ये विशेष सवलत देऊन त्यांना शिक्षण घेण्याची संधी विशेषत ग्रामीण मुलींसाठी उपलब्ध करून दिलेली आहे.मुलींसाठी सिनीअर कॉलेज,डी. एड, बी.एड, एम.एड,बी.एस्सी,बी.कॉम,होम सायन्स,कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,विधी लाॅ काॅलेज,डी फाॅर्मसी या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध केलेल्या आहेत.तसेच NDA Wing,स्पर्धा परीक्षा केंद्र जीई,नीट सीईटी क्लासेसची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. संस्थेचे सर्व प्राचार्य,प्राध्यापक वृंद,व सर्व सहकारी आत्मियतेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकाससाठी अहोरात्र प्रयत्नशिल असतात,त्यामुळे अतिशय कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातूनही विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी त्रिमूर्तीला प्राधान्य देतात.
अशा या अत्यंत प्रभावशाली आणि व्यक्तिमत्त्वातच करिश्मा असलेल्या नेतृत्वामध्ये काम करणे हे मी माझे भाग्य समजतो,शिक्षणमहर्षी आदरणीय साहेबरावजी घाडगेपाटील साहेब यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो हिच प्रभुदत्त चरणी प्रार्थना.
शब्दांकन प्रा बाळासाहेब कोकरे
मानद विश्वस्त तथा मुख्य प्रशासक त्रिमुर्ती शैक्षणिक संकुल शेवगांव जि.अहमदनगर
मो.नं 8805247094