अमरावती : सैनिकी मुलांचे वसतिगृह, अमरावती येथील अशासकीय वसतिगृह अधीक्षक (मानधनाचे पद) या पदाचा कालावधी दि. 15 जुलै 2023 रोजी संपुष्टात येत असल्याने रिक्त होत आहे. तरी माजी सैनिक सुभेदार, नायब सुभेदार व हवालदार संर्वगातून ‘वसतिगृह अधीक्षक’ या एका पदासाठी जागा भरावयाची आहे. हे पद अशासकीय, तात्पुरत्या स्वरूपाचे व एकत्रित मानधनावर असून त्यासाठी दरमहा 29 हजार 835 रूपये इतके मानधन अदा करण्यात येईल. माजी सैनिकास सैनिकी मुलांचे वसतिगृह, अमरावती येथे निवासी रहावयाचे आहे. शैक्षणिक अर्हता 10 वी अथवा 12 वी पास असलेल्या इच्छुक माजी सैनिकांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह बुधवार, दि. 5 जुलै 2023 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे सादर करावेत. 5 जुलैनंतर अर्ज स्विकाराण्यात येणार नाही. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0721-2661126 या क्रमांकवर संपर्क साधावा. तसेच नायब सुभेदार व सुभेदार संवर्गातून उमेदवार उपलब्ध न झाल्यास हवालदार या प्रवर्गातून पद भरण्याबाबत विचार करण्यात येईल. इच्छुक माजी सैनिकांनी विहित कालमर्यादेत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आशिष बिजवल यांनी केले आहे.