शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : येथे आंतर राष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. सेलू तालुक्यातील पतंजली योग समिती शाखा सेलू व क्रांती फाउंडेशन च्या समन्वयाने योग अभ्यास शिबीर आयोजित करण्यात आले होते.या वेळी सेलू येथील पुरुष व महिला भगिणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहणे म्हणून सेलू चे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे व तहसीलदार दिनेश झापले होते, तसेच योग समिती चे ज्ञानोबा बरसाले, डॉ.विनायकराव कोठेकर सर, डि.के. देशपांडे सर, माकोडे सर ,डाॅ माकोडे , सौ. राठी, कांचन बाहेती,निता बलदेवा तालुका अध्यक्ष योग गूरू , गटकळ ॲकाडमी , क्रांती फाउंडेशन च्या अध्यक्षा पोर्णिमा जोहीरे , छाया पाचलेगाकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन पोर्णिमा जोहिरे यांनी केले.


