मुकेश मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
आज दि. २०/०६/२०२३ रोज सोमवारला भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे तसेच प्रदेश महासचिव धनंजय दलाल,ॲड.जयंत वैरागडे, यांच्या नेतृत्वात शिंदे सरकारचा गद्दार दिवस साजरा करण्यात आला. शिंदे गटाने महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीला २० जून रोजी एक वर्ष पुर्ण होत आहे. खोकेवीरांच्या वर्षपुर्तीनिमित्त गद्दार दिवस राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून करण्यात आला. एकनाथ शिंदे मागील वर्षी महाराष्ट्राशी गद्दारी करुन गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाविरोधात वर्षपुर्ती झाल्यानंतर ही सरकार युवकांना रोजगार, महागाई, शेतकरी, शेतमजूर या सारख्या सर्वच मुद्यावर अपयशी ठरलेल्या या खोके सरकार शिंदे गटाविरोधात सत्तांतराचा निषेध म्हणून प्रतिकात्मक घोषणा करुन गद्दार दिवस म्हणून निषेध करण्यात आला. खोक्यांचे राजकारण करुन धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली. कट करून फोडा फोडीचे राजकारण करुन शिंदे – भाजप सरकार सत्तेत आले. म्हणून भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे हा दिवस गद्दार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. शिंदे भाजप गट सरकार विरोधात नारेबाजी करण्यात आली तसेच गद्दार हटाव महाराष्ट्र बचाव, महाराष्ट्रातून गद्दार होणार हद्दपार अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, महिला जिल्हाध्यक्ष सरिता मदनकर, शहर अध्यक्ष हेमंत महाकाळकर, बाबु बागडे, ता. अध्यक्ष नरेंद्र झंझाड, पं.स.सभापती सौ. रत्नमाला चेटूले, ता. अध्यक्ष सौ. किर्ती गणविर, सौ. मंजुषा बुरडे, गणेश चौधरी, राहुल निर्वाण,मनिष वासनिक, अश्विन बांगडकर, महेंद्र बारापात्रे, सौ. स्वाती मेश्राम, सौ.धनवंता बोरकर, विकेश मेश्राम, प्रभाकर बोले, संजय बोंद्रे, यशवंत वाघाये, निरज शहारे, महेश जगनाडे, विजय ईश्वरकर,नागेश भगत, राजु पटेल, विष्णू कढिखाये, सुनिल भोपे, विलास खांदाळे, संजय वरगंटीवार, दयानंद नखाते, पंकज भुरे, सुखराम शेंडे, फरहान पटेल, रीजवान खान, दामाजी शेंडे, प्रवीण शेंडे, चंद्रमान कारेमोरे, शंकर कारेमोरे, जुमाला बोरकर, सौ. कांचन वरठे, सौ. निरुताई पेंदाम, सौ. रिना साखरकर, सौ. संजोक्ता सोनकुसरे, सौ. राधिका भुरे, विनोद बन्सोड, प्रज्ञा मेश्राम, गीता कागदे, शालीक कागदे, रमेश मदनकर, अमन मेश्राम, लोकेश नगरे, किरण वाघमारे, रवि पुडके, शकिलभाई कुरैशी, किर्ती कुंभरे, व फार मोठया संख्येने शहरी, ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..