विनय वनारसे
तालुका प्रतिनिधी महाड
महाड ग्रामपंचायत चांभार खिड मधील सर्वे न.143/ब 7 मधील सोमजाई अपार्टमेंट इमारत राजेंद्र दळवी आणि श्री बाल्लाजी बिल्डर आणि डेव्हलपर यांचा मार्फत बांधकाम केले असून सदर इमारतीला मा. जिल्हा अधिकारी अलिबाग यांची 3 मजले परवानगी असताना इमारती मधील तळमजल्यावर 3 अनधिकृत सदनिकांचे बांधकाम केले आहे इमारतीच्या तळमज्यालवरील बांधकामाची परवानगी कोणतीही नसताना बांधकाम झाले असून ग्रामपंचायत मध्ये या बाबध काही माहिती नसल्याच्या सांगण्यात येत असून ग्रामपंचायत मधून इमारतीला 3 मजले ची परवानगी असून इमारतीच्या तळमज्यावर अनधिकृत बांधकाम झाले आहे इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून अनेक ठिकाणी इमारती बाबध इमारती मधील रहिवाशीच्या तक्रारी दाखल असून कोणतीही ठोस कारवाही झाली नाही इमारतीचे बांधकाम करण्याऱ्या बिल्डर मधील काही व्यक्ती राजकीय पक्षा चे असल्या मुळे समंधित अधिकारी हे या अनधिकृत बांधकामावर कारवाही करण्यास दिरंगाई करत असल्याचे दिसून येत असून इमारती मध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्या मुळे रहिवाशी नागरिकांचे हाल होत आहेत अनधिकृत बांधकाम, अनधिकृत पणे तळमज्यावर झालेली तोडफोड,निकृष्ट बांधकाम या मुळे रहिवाशांचे जीव धोक्यात आले असून, भविष्यात काही अनुचित प्रकार घडला याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


