शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : परभणी जिल्ह्यातील सेलू येथील श्री ह.भ. प. जयरामजी तांगडे महाराज यांची ज्ञानाई दिंडीचे सोमवारी (दि.9) सेलू येथून सायंकाळी सहा वाजता प्रस्थान झाले. यावेळी साईबाबा सहकारी नागरी बँकेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हेमंत राव आढळकर व श्री राम नाना खराबे पाटील, आबासाहेब डख आदी च्या परिवाराच्या वतीने महापुजा व आरती करण्यात आली.श्री.जयराम तांगडे महाराज यांच्या ज्ञानाई दिंडीचे पंढरपुरला जाण्यासाठी दि.9 जून रोजी प्रस्थान झाले आहे. त्यावेळी दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी साईबाबा सहकारी नागरी बँकेचे अध्यक्ष श्री.हेमंत राव आढलकर, व श्री. राम नाना खराबे पाटील तसेच आबासाहेब डख रामराव डख यांच्या हस्ते श्रींच्या पादुकांची महापुजा व आरती करण्यातआली.मागील अनेक वर्षापासून ही पायी वारी पंढरीला जात असते. यावर्षीही वारकर्यांना पांडूरंगाच्या भेटीची ओढ लागली आहे. त्या अनुषंगाने श्री जयराम तांगडे महाराज यांच्या दिंडीत शेकडो वारकरी पंढरपुरला निघाले आहेत. या वर्षी सुद्धा अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


