रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
केळी उत्पादक शेतकरी संघाचे शिष्टमंडळ केळी उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या बाबत दि 1 जून 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेवून केळीचे पडलेले भाव यासंदरर्भात चर्चा केली .केळीचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करावा ,केळीला 18.90 हमीभाव मिळावा, तसेच प्रतीबंधीत असलेली कृषी औषधे कृषी केद्रावर सापडल्यास संबंधीत कृषी अधिकारी यांना जबाबदार धरावे यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. केळीचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करण्या संदर्भात येणाऱ्या कॅबीनेट च्या मिटींगमध्ये विषय घेण्याच्या सुचना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी संबंधीत सचीव यांना सूचना केल्या. या प्रसंगी संघाचे अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण ,उपाध्यक्ष डॉ राहुल बच्छाव पाटील, अतुलनाना माने पाटील ,
राज्य समन्वयक सचिन कोरडे ,मार्गदर्शक विजयसिंहदादा गायकवाड,
राज्य तज्ञ संचालक रविंद्र डिगे ,नामदेव वलेकर , पंढरीनाथ इंगळे, हनुमंत चिकणे, संजय रोंगे ,
जळगांव जिल्हा अध्यक्ष राजेश नवाल ,सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील ,उपाध्यक्ष सचिन गगथडे पंढरपुर ,
तालुका अध्यक्ष संतोष उपासे ,माढा ता अध्यक्ष केशव गायकवाड पाटील आधी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यावेळी
उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केळी उत्पादक शेतकरी संघाच्या पदाधिकारी यांच्याशी केळी पिका बाबत सविस्तर चर्चा करून , केळी उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांचे लवकरच समाधान करण्यात येईल असे यावेळी मनोगत व्यक्त केले.


