रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा येथे शेतकऱ्यांचे बियाणे शेतकऱ्यासाठी या संकल्पाने बियाणे महोत्सव 2023 चे आयोजन दिनांक 06 जून रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती तेल्हारा येथे कृषि विभाग तेल्हारा , कृषि उत्पन्न बाजार समिती तेल्हारा, आत्मा तेल्हारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले.
शेतकऱ्यांचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी घरचे बियाणे वापराबाबत मोहीम कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.याचाच भाग म्हणून बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून अकोट मतदार संघाचे आमदार मा.श्री. प्रकाशजी भारसाकळे उपस्थित होते.कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती सौ.संगीताताई अढाऊ जी.प.अध्यक्षा , श्री सुनील इंगळे सभापती कृउबास श्री.प्रदीप ढोले उपसभापती कृउबास सौ.आम्रपालीताई गवारगुरू सभापती पं. स. सौ.जयश्रीताई घंघाळ सदस्य पंस , संजय हिवराळे पंस तसेच सर्व संचालक मंडळ कृउबास जि. प.सदस्य, पंस सदस्य, तसेच पत्रकार बंधूं व शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री नरेंद्र राठोड तालुका कृषि अधिकारी तेल्हारा यांनी केले.कार्यक्रमात मागील वर्षीतील पीक स्पर्धा विजेते शेतकरी श्री भारत थोरात व समाधान सातव यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच महिला शेतकरी यांना सोयाबीन मिनिकिट बियाणे चे वाटप करण्यात आले.त्यानंतर शेतकऱ्यांना उगवणक्षमता तपासणी व बीजप्रक्रिया महत्व सांगून प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवत बियाण्याची खरेदी केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र माळी मंडळ कृषी अधिकारी यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री पंकज राऊत यांनी केले.
कार्यक्रमात विधवा महिलांसाठी मिनिकिट वाटप,पीक स्पर्धा विजेते शेतकरी सत्कार,नॅनो युरिया मार्गदर्शन,बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक,शेतकरी चर्चा
यासारख्या असंख्य घडामोडी या कार्यक्रमात झाल्या. कार्यक्रमाचे नियोजन गौरव राऊत मंडळ कृषी अधिकारी व मोगरे बीटीएम यांनी केले.


