सत्यपाल वाघमारे
तालुका प्रतिनिधी खेड
शैक्षणिक वर्ष 2022/23 चा एस. एस. सी चा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला नवोन्मेष विद्यालय चाकण या शाळेचे एकूण २३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झालेले होते .विद्यालयाचा एकूण शेकडा निकाल १००% लागला,
या शाळेने गेल्या पाच वर्षापासून ही शंभर टक्के उत्तीर्ण होण्याची परंपरा याही वर्षी कायम राखली सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या व सर्व शिक्षकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या
या शालांत परीक्षेतील
प्रथम पाच विद्यार्थी
१) साक्षी मंगेश शिरोळे ८७.४०%
२)समृद्धी महादेव खंडागळे ८६.६०%
३)सिद्धी सचिन चिखले ८६.००%
४)साई अशोक उगले ८५.४०%
५)अमन सुनील शेगांवकर ८५.२०%