विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर : पारधी बांधव आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये निर्माण झालेली दरी कमी करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे पुणे लोहमार्ग येथील पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी इंदापूर तालुक्यातील डिकसळ या ठिकाणी पारधी समाज बांधवांच्या गावभेट दौऱ्यात बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की लवकरच रेल्वे पोलीस खाते अंतर्गत या समाजाचा मेळावा आयोजित करणार असुन या समाजातील सुशिक्षित तरुणांना व्यवसायाकडे आणि शासकीय नोकरीत काम करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे.
यावेळी या समाजाचे प्रदेशाध्यक्ष नामदेवराव भोसले यांनी सांगितले कि, पिढ्याने पिढे या समाजाच्या नावावर चोर , दरोडेखोर हा शिक्का बसला आहे. त्यामुळे यांच्या नावासमोरील हे कलंकित नाव कमी करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून या समाजातील बहुतांशी लोक हे मच्छीमार व्यवसाय करून आपली उपजीविका करत असून या समाजातील तरुण आता शिक्षण घेऊन पुढे येत आहे तसेच गाव कारभारात सहभाग नोंदवत आहेत. यावेळी पुणे रेल्वे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हा समाज वास्तव करत असलेल्या नदीकाठी जाऊन त्यांच्या मुलांची तसेच ते व्यवसाय करीत असलेल्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी दौंडचे ए.पी.आय. युवराज कलकुटगे , कुर्डवाडी च्या पी.आय संगीता हत्ती, वाघमारॆ ,पठारे,नवनाथ पवार आधी पोलीस स्टॉप व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.