अविनाश पोहरे
ब्युरो चिफ,अकोला
पातुर : ऊन थंडी वारा अंगावर झेलत अनेक वर्षापासून असलेल्या एका मतिमंद महिलेला मायेचा आधार पातूरच्या खाकी वर्दीनी दिला आहे. होळीच्या पूर्वसंध्येला या मतिमंद महिलेला पातूरचे ठाणेदार हरीश गवळी व पोलिसांनी दिलेली ही मायेची कौतुकाचा विषय ठरला आहे. खाकी वर्दीतील माणुसकी जपणारे पातुर पोलीस व होमगार्ड पातूर पोलीस स्टेशनचे आदर्श ठाणेदार हरीश गवळी यांच्या संकल्पनेतून उपनिरीक्षक मीरा सोनुणे यांच्या सहकार्याने आज पातूर पोलीस स्टेशन येथे माणुसकी चा संदेश म्हणून होळीच्या पूर्वसंध्येला व महिला जागतिक दिनाचे अवचीत्त साधून पातुर येथील जुने बस स्टॅन्ड परिसरात वावरणारी एक मतिमंद महिला मंदा वसतकार भंडारज ह.मु.पातुर पोलीस स्टेशन समोर या महिलेला साडी चोळी व उपयोगी वस्तू देऊन होळी साजरी करण्यात आली.गेले कित्येक दिवसापासून या महिलेने आंघोळ केली नव्हती.जटा झालेले केसाचा बुचडा झाला होता.अंगावरचे कपडे पुर्णताह घाण झाले होते.ही महीला स्वच्छ होण्यास नाकार देत होती. परंतु खाकी वर्दीतील महीलांचे मातृत्व जागे झाले होते.या महीलेला लहानमुला प्रमाणे समजुन आंघोळ घालुन तिचे जटा झालेले केस कापुन व कपडे स्वच्छ करुन तिला नवीन कपडे साळी चोळी परीधान केले. यावेळी पातुर होमगार्ड तालुका समादेशक संगीता इंगळे सह महिला होमगार्ड माधुरी खंडारे, सुनीता पवार,वनिता वानखडे ,सुनीता इंगळे महिला पोलीस नम्रता,सोनाली यांनी अथक परिश्रम घेतले व आज होळी च्या दिवशी मंदा ला स्वच्छ मंदाकिनी बनवले.


