कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यमाने बौद्धाचार्य परीक्षा ३० ऑक्टोंबर २०२२ संपूर्ण देशात घेण्यात आली होती.तसेच महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आलेली होती.या परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र मधून ५९६ श्रामनेर विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील प्रा. डॉ. उत्तम नागोराव शेंडे हे अकोला परीक्षा केंद्र येथे बसले होते. त्यांनी महाराष्ट्रातून २०० गुणापैकी १७२ गुण मिळवुन महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे .या कार्याबद्दल त्यांचे महाराष्ट्रभर अभिनंदन होत आहे.तसेच पुसद तालुक्यातून तुकाराम सखाराम चौरे २०० गुणापैकी १४४ गुण ,भोलानाथ सखाराम कांबळे १३० गुण , प्रल्हाद यादव खडसे १२३ गुण, कृष्णा नायबराव दांडेकर १२१ गुण घेऊन हे पास झाले आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे .यवतमाळ पूर्वचे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाअध्यक्ष भगवानजी इंगळे तर यवतमाळ जिल्हा पश्चिमचे जिल्हाअध्यक्ष रवीजी भगत यांनी तसेच इतरही समाज बांधवांनी शब्द सुमनांनी शुभेच्छा दिलेल्या आहे. यवतमाळ जिल्ह्याचं नाव बौध्दाचार्य परीक्षेत प्रा. डॉ. उत्तम नागोराव शेंडे यांनी मोठे करून यवतमाळ जिल्ह्याचे नाव यादीत पहिल्या क्रमांकावर आणलेत सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)