कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : श्रीरामपूर येथील विश्वदिप महाबोधी विहारात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी से.नि.मंडळ अधिकारी विजयराव स्थुल, प्रमुख अतिथी म्हणून,योग शिक्षक ल.पुं.कांबळे,डी.एस.कांबळे, प्रकाश आळणे, चंद्रकांत आठवले उपस्थित होते.सुरवातीला प्रमुख अतिथींच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथींनी संत गाडगेबाबा यांच्या जिवावर सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचलन व आभारप्रदर्शन बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष साहेबराव गुजर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्व दिप महाबोधी विहाराचे सर्व सभासदांनी सहकार्य केले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)