चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधि अकोट
अकोट : येथे मराठा सेवा मंडळाची बैठक सोपानराव गलांडे यांचे प्रतिष्ठान येथे घेण्यात आली.अकोला येथे होणाऱ्या दि.८जानेवारीला वधु वर व पालक परिचय मेळावा घेण्यात येणार आहे तसेच अकोट येथे १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे नियोजन करण्यात येईल व अकोट तालुक्यातील कार्यकरणी निवड करण्यात आली आहे.ही बैठक सर्व जेष्ठ नागरिक व समाज बांधव यांच्या उपस्थितीत पार पडली.निवड करण्यात आलेली कार्यकारणीत अध्यक्ष पदावर सुहास प्रल्हाद वाघ,उपाध्यक्ष वैभव कैलास जाधव,सचिव दीपक अरुण जगताप,कोषाध्यक्ष रमेश कल्याण गलांडे,कार्याध्यक्ष गोपाल गटकळ,सदस्य प्रलाद लावंडे, राजेंद्र शिंदे,सोपान गलांडे,राजेश साळुंखे,नवल शिंदे, संकेत राऊत, मनोज शिंदे,अभिजित हिवरे,रवी मोरे,प्रदिप कदम,शुभम सोनोने,विकास गटकळ यांची निवड करण्यात आली आहे.