अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
अकोला : शालेय जीवनात विद्यार्थ्यांना गुरुजनांचा पालकांचा संस्कार हा महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार झाल्याशिवाय सुसंस्कृत विद्यार्थी युवक घडणार नाही त्याकरिता सर्वप्रथम विद्यार्थी युवकाला भविष्य घडवायचे असेल तर विद्यार्थी दशेतच व्यसनमुक्तीचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा असे प्रतिपादन अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय संघटक तथा ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले यांनी केले. सोमवारी 12 डिसेंबर रोजी पातुर तालुक्यातील तुलंगा खुर्द येथे देशभक्त उच्च माध्यमिक विद्यालय तांदळी खुर्द यांच्या वतीने किसान महाविद्यालयाचे प्रांगणामध्ये शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती अंतर्गत आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात आजचा युवक व व्यसनमुक्तीची गरज या विषयावर बौद्धिक सत्रा मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देवानंद गहिले बोलत होते.ते पुढे बोलताना म्हणाले की विद्यार्थी दशे मध्ये साथ – संगत योग्य असणे गरजेचे आहे.संगत गुण व्यसनाधीन आणि व्यसन लावणारा नसला पाहिजे असे बोलून त्यांनी संत तुकडोजी महाराज यांच्या भजनाचे ओळी सादर करून विश्लेषण केले. आणि व्यसनामुळे कसे दुष्परिणाम होतात याबाबत कविता सादर केल्या कविता गायनामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये प्रचंड जोश संचारला आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी सुद्धा कविता आणि गीतांचे गायन अतिशय उत्कृष्टरित्या यावेळी केले. यासोबतच या शाळेचे शिक्षक ओम रमेश कचाले तसेच रोशन चतरकार यांनी सुंदर कविता सादर केल्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या कवितांना शाळेचे मुख्याध्यापक सुहास शेळके कार्यक्रम अधिकारी भास्कर काळे यांनी भरघोस बक्षीस प्रदान केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुहास शेळके किसान विद्यालय तुलंगा यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक भास्कर काळे जिल्हा समन्वयक व कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले
तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक शिक्षक निर्देशक व शिक्षकेतर कर्मचारी देशभक्त तंत्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तांदळी खुर्द व सर्व गावकरी मंडळी तुलंगा यांनी परिश्रम घेतले.


