अविनाश पोहरे
ब्युरो चिफ,अकोला
अकोला : दिनांक – 03/12/2022 जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अब्दुल कलाम सभागृह, अकोला येथे अकोला प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने अकोला जिल्ह्यातील युथ आयकॉन पुरस्कार, उत्कृष्ट दिव्यांग सेवक पुरस्कार तसेच उत्कृष्ट रुग्ण सेवक पुरस्कार तथा सामाजिक सेवक यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी अकोला जिल्यातील पातूर तालुक्यातील आस्टूल या खेडेगावातील राहणारे अमोल करवते यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कामे,रुग्ण सेवा व दिव्यांगांसाठी निस्वार्थी काम करत आहेत.या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल अकोला जिल्ह्यातील प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने अमोल प्रकाश करवते आस्टूल यांना उत्कृष्ट रुग्ण सेवक पुरस्काराने गौरविण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शासकीय महाविद्यालय डीन मीनाक्षी गजभिये,अकोला क्रीडा अधिकारी डॉ.जुबेर नदीम, तसेच अकोला जिल्ह्यातील व तालुक्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.