नाशिक : गंगापूर रोडवरील सावरकर नगर परिसरातील शारदा नगर भागात चोरट्याने घरफोडी करून चार लाख ७८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. रेखा जयेश राय (रा. शारदा नगर) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, चाेरट्याने २७ नोव्हेंबरला दुपारी बारा ते सोमवारी(दि.२८) सकाळी सहाच्या दरम्यान, घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा दरवाजा उघडून घरफोडी केली. घरातील सुमारे १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ९० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत.