सय्यद रहीम रजा
ग्रामीण प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड : संविधान दिन निमित्त दर्पण पत्रकार संघटना उमरखेड यांच्या तर्फे संविधान दिन गौरव सोहळा 26 नोव्हेंबर 2022 रोजी साजरा करण्यात आला. संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन व उमरखेड शहरातील असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले. उमरखेड माहेश्वरी खुले नाट्यगृह मैदान येथे भारतीय संविधानाचे महत्त्व सांगून उद्देशिका देण्यात आल्या. उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संविधान दिन निमित्त न्याय, स्वातंत्र्य, समता बंधुता या विषयावर मा. अँड.इम्रान देशमुख जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ मा. अँड जयसिंग चव्हाण जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ यांनी मार्गदर्शन केले. तसेच माजी आमदार विजयराव खडसे यांनी मार्गदर्शन केले उमरखेड दर्पण पत्रकार संघटना उमरखेड अध्यक्ष डॉ. आयुब खान आमिर खान पठाण व.उपाध्यक्ष डॉ. आंबेजोगाई कर, सचिव सतीश कोल्हे, चुनोमिया काझी, निसार पेंटर, सविता चंद्रे, दैनिक पत्रकार संघटना अध्यक्ष.अजहरउल्ला खान, संतोष मुडे, शैलेश ताजवे, सय्यद रहीम रजा, इरफान पठाण इत्यादी लोक उपस्थित होते.