अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : दिनांक 26 नोव्हेंबर 2022
स्थानिक तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथील इलेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला अंतर्गत असलेल्या एनसीसी कॅडेटसनी अतिशय उत्साहात 73 वा राष्ट्रीय छात्र सेना दिवस साजरा केला.इलेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला चे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजोय चौधरी यांनी जिल्ह्यामध्ये एनसीसी दिवस साजरा करण्याचे आवाहन केले. त्यालाच अनुसरून तुळसाबाई कावल विद्यालय पातुर येथील एनसीसी कॅडेट्स यांनी पातुरामध्ये सायकल रॅली काढून एनसीसी दिवसाचे महत्व लोकांना पटवून दिले. ही रॅली पातुर अकोला रोडवरील बुद्धभूमी या ठिकाणापर्यंत गेली, तेथून कॅडेट्सनी विश्वभारतीला भेट देऊन तेथील माहिती घेतली. आणि नंतर फायरिंग रेंज वरती जाऊन कशाप्रकारे फायरिंग होते याबद्दलची माहिती मिळवली. पुढे ट्रेकिंग आणि हाकिंग हा एनसीसी मधला विषय याचा प्रत्यक्षात अनुभव घेतला. नांदखेड परिसरात असलेले तीन तोंडी टाके जे अखंड दगडामध्ये कोरलेले आहे याला सुद्धा भेट दिली. बुद्धभूमी परिसरातील साफसफाई करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून घेतले. सोबतच वनभोजनाचा आनंद सुद्धा घेतला.एनसीसी विषयाबद्दल विस्तृत माहिती सुभाष इंगळे एनसीसी ऑफिसर यांनी कॅडेट्सला दिली. स्वच्छतेवरती व्याख्यान विद्यालयाचे शिक्षक एम एस चव्हाण यांनी कॅडेटसला दिले.कॅडेट्सच्या या कार्याचे कौतुक विद्यालयाचे प्राचार्य अंशुमानसिंग गहिलोत, उपप्राचार्य एस बी चव्हाण , उपमुख्याध्यापिका आर एस ढेंगे , पर्यवेक्षक एम बी परमाळे, जगमोहनसिंह गहिलोत व सर्वत्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.


