अविनाश एस. पोहरे
ब्युरो चिफ अकोला
अकोला- दि : २७ ॲाक्टोबर २०२२ दि अशोका बुध्दीस्ट फाऊंडेशन द्वारा वर्षावास समापन समारोह निमित्त अमरावती येथे आयोजित राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत अकोल्या च्या विशाल लक्ष्मण नंदागवळी यांनी प्रथम पारितोषिक प्राप्त केले.दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील दि अशोका बुध्दीस्ट फाउंडेशन अमरावती च्या वतीने मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम राबविण्यात आले होते. त्या उपक्रमात देशातील व परदेशातील पाहुण्यांनी सहभाग नोंदविला होता.यामध्ये राज्यस्तरीय भव्य खुल्या वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वादविवाद स्पर्धेचा विषय होता “राज्य समाजवादाचा स्विकारचं लोकशाहीतून आर्थिक समानता प्रस्थापित करू शकेल’ यामधे विषयाच्या बाजुने विशाल नंदागवळी यांनी आपली बाजू भक्कम आणि अभ्सासपूर्ण रित्या मांडली.स्पर्धेत राज्यातील विविध शहरातील जसे मुंबई, नाशिक, नागपूर, नांदेड अशा अनेक जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.त्यात अकोल्यातील विशाल नंदागवळी यांनी सर्वोत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम पारितोषीक प्राप्त केले. बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम १०,०००/- सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असे होते.विशाल च्या यशामुळे सर्वचं स्तरावरून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॅा.एम आर इंगळे,डॅा.मनोहर वासनिक, प्रा राहुल माहुरे, प्रा ॲड आकाश हराळ, प्रा प्रकाश गवई, अमीत लोंढे, आदित्य बावनगडे, रोहीत पाटील, विक्की मोटे, राहुल कुरे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.