अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
अकोला : महाराष्ट्र पोलीस यांना अमरावती खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांशी हुज्जत करून मुजोरपणा व अपशब्द वापरले आहे. त्याबद्दल महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने मा.एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, मा.देवद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई मार्फत जिल्हाधिकारी निमा अरोरा अकोला खा.नवनीत राणा यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असे महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या निवेदनात म्हटले आहे. अमरावती च्या खासदार नवनीत राणा यांनी दि . ०७ / ९ / २०२२ रोजी अमरावती शहरातील पोलीस स्टेशन राजापेठ येथे उपस्थित वरीष्ठ पोलिस अधिकारी व ईतर कर्मचाऱ्यांच्या समक्ष पोलीस स्टेशन मध्ये जाऊन माझा फोन तुम्ही रेकॉड कशासाठी केला , असे विचारून वरीष्ठ पोलीस अधिकारी साहेबांच्या टेबलवर मोबाईल आपटला , अत्यंत जोरजोरात सर्व पोलीस अधिकारी सोबत वाद घालून जनतेच्या नजरेतून पोलिसांची मानहानी करण्याचे कृत करतांना अखंड महाराष्ट्र ने पाहिला त्यामधून हे लक्षात येते की काही राजकारणी आपला पदाचा धाक दाखवून पोलीस अधिकारी यांच्या कामकाजात अडथळा निर्माण करत आहेत तसेच त्यांचा हा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रा प्रसारित झाला.त्यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलीस बॉईज असोसिएशन अकोला व पोलीस कुटुंब अत्यंत दुःख सहन करत आहे कायदयची जाण नसणाऱ्या बेजबाबदार सूड ची भावना कृत्य करणाऱ्या खा.नवनीत राणा यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्षहजर राहून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या वरील खासदारवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी व खा नवनीत राणा यांनी पोलीस अधिकारी यांची माफी मागावी तसेच राजीनामा द्यावा.
असे झाले नसता पोलीस बॉईज असोसिएशन धरणा आंदोलन करेल.पोलिसांच्या कुटुंबियांना कार्यरत पोलिसांना न्याय द्यावा. पोलिसांच्या मुलांना पोलीस भरती मध्ये 5 % आरक्षण देणारी एकमेव संघटना असून महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन चे संस्थापक / अध्यक्ष मा. रवि वैद्य व राज्य संघटक मा. माणिक निमसे हे आहेत.निवेदन देतेवेळी अर्जुनसिंह गहिलोत जिल्हाध्यक्ष अकोला, अविनाश पोहरे उपाध्यक्ष विद्यार्थी आघाडी पातूर, अविनाश गवई सहसचिव, सै. तौसिफ़, पवन सुरवाडे, रामेश्वर वाढी, रवि चव्हाण, शेख. समीर, सै.शेहजाद, सुरज राठोड, विशाल राठोड, योगेश जाधव, भारत राठोड यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन अकोला.