ऋषिकेश ओझा
शहर प्रतिनिधी ,पुणे
पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी काँग्रेस भवनमध्ये झाली . ह्या बैठकी मध्ये काँग्रेसने महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा नारा देत प्रभागात पक्षबांधणीच्या तयारीला लागा अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत .
एकेकाळी काँग्रेसची सत्ता असलेल्या काँग्रेसने आता अस्तित्वाची लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे . त्यामळे आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढावी , अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केल्याचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे . या मागणीनुसार आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांनी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्रभागाची आणि पक्ष संघटनेची बांधणी करायला सुरवात करावी , असा निर्णयही , सर्व सहमतीने घेण्यात आला असे या पत्रकात म्हटले आहे .या आधीही कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा प्रदर्शित केली होती .आणि तसे राज्यात पक्षश्रेष्ठींना कळवलेही होते .
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)