पेनटाकळी धरणाचेही ९ दरवाजे उघडले
बुलडाणा : जिल्ह्यातील विविध भागांत तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन – चार दिवसांपासून प्रचंड पाऊस पडत आहेत. याचाच परिणाम म्हणून या धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेला खडकपूर्णा प्रकल्प आधीच तुडुंब भरलेला आहे. त्यात परतीच्या पावसांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस पडल्याने आज, १९ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजता १३ दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले. यामुळे नदीपात्रात आता १४१९६.०७८ क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू आहे. पाऊस असाच कोसळत राहिला तर आणखी दरवाजे उघडावे लागू शकतात. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे पेनटाकळी प्रकल्पाचे ९ दरवाजे आज,१९ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता उघडण्यात आले आहे. त्यामुळे पैनगंगा दुथडी भरून वाहत आहे.